आंबेगाव तालुक्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न!!
आंबेगाव तालुक्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न!!
प्रतिनिधी – समीर गोरडे
शरण शरण हनुमंता जी… तुम्हा आलो!! रामदुता बजरंग बली की जय!! अशा उद्घोषणा देत आंबेगाव तालुक्यात हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला.
अवसरी खुर्द येथील हनुमान मंदिरात ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी यांचे हनुमान जन्माचे किर्तन संपन्न झाले.तसेच आदर्श ग्राम गावडेवाडी येथे ह.भ.प. धोंडीभाऊ महाराज शिंदे यांचे कीर्तन संपन्न झाले.तर अवसरी बुद्रुक येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.
तालुक्यातील शिंगवे,पारगाव,भागडी घोडेगाव,भीमाशंकर,शिनोली,कळंबआदी गावात हनुमान जन्मोत्सव उत्साहान संपन्न झाला.
थोरांदळे येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव संपन्न झाला. येथे हजारो भाविकांना पुऱ्या गुळवणी व कांद्याची चटणी महाप्रसाद म्हणून देण्यात आला.आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळीच पहाटे पाच वाजता हनुमंतरायांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भाविकांनी रांगा लावून हनुमंतांचे दर्शन घेतले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये अतिशय उत्साहात हनुमान उत्सव संपन्न झाला.
अवसरी खुर्द आंबेगाव येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्माचे पहाटे पाच ते सात वाजता ह.भ. प.मधुकर महाराज गायकवाड यांचे हनुमान जन्माचे कीर्तन संपन्न झाले.