ताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा मंदिरात संगमरवरी बैल जोडीच्या शिल्पाचे अनावरण!!

आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा मंदिरात संगमरवरी बैल जोडीच्या शिल्पाचे अनावरण!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबा देवस्थान मंदिर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असून सह्याद्रीच्या कपारीत वसलेले पुरातन व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे स्थान आहे.या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम चांगल्या व वैचारीक पध्दतीने झालेले असून मंदिराचे प्रांगणसुध्दा कलात्मक पध्दतीने आखीव —रेखीव बनवलेले आहे. सुंदर व आकर्षक वेगवेगळ्या संगमरवरी मूर्तीच्या स्थानपन्नतेमुळे या ठिकाणाचे नाविण्यपूर्ण चैतन्य बहरुन जाते.या मंदिर परिसरात आल्यावर देवस्थानाच्या जागृतपणाची अनूभूती जाणवल्याशिवाय राहात नाही असे गौरवोद्बगार संगितविशारद ह.भ. प. पांडुरंग महाराज सुक्रे यांनी काढले.

धामणी येथील खंडोबा मंदिराच्या महाद्बाराबाहेरील ओट्यावर संगमरवरी बैलजोडीचे शिल्प कासारवाडी येथील आचार्य आनंदॠषीजी स्कूलचे अध्यक्ष प्रा अशोककुमार, विलासकुमार पगारीया व कुटुंबिय आणि भोसरी येथील रोटरी क्लब आँफ डायनँमिकचे अध्यक्ष ज्ञानेश्वरमाऊली विधाटे व कुटुंबिय यांनी रविवारी (११फेब्रु२३)धर्मबीजेला खंडोबा देवस्थानाला अर्पण केले.

त्यावेळी शिल्पाचे अनावरण भाविकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पगारीया व विधाटे कुटुंबियाच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सुक्रे महाराज बोलत होते.ग्रामस्थांच्या वतीने पगारीया व विधाटे कुटुंबियाचा मानाचा फेटा व श्रीफळ देऊन देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत यांनी सत्कार केला.

यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष गजारामभाऊ जाधव पाटील, देवस्थानाचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव,माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले,सरपंच रेश्मा बोर्‍हाडे,सुभाष तांबे,माजी सरपंच सागर जाधव,सुनील जाधव,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,विलासकुमार पगारीया,कल्पेश पगारीया,राहूल पगारीया,मयुर पगारीया,शांताराम जाधव,सदस्य अक्षय विधाटे,उत्तम जाधव,वामनराव जाधव, मा.सरपंच अंकुश भुमकर,मनोज तांबे,गणेश तांबे कैलास वाघ,शांताराम भगत,अशोक जाधव,ज्ञानेश्वर बोर्‍हाडे,आण्णा बोर्‍हाडे,दिनेश जाधव,पांडूरंग भगत आणि ग्रामस्थ,भाविक,सेवेकरी मंडळी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.