आरोग्य व शिक्षणसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव) खंडोबा मंदिराला थोरात बंंधूची विनामूल्य आकर्षक रोषणाई!!

माघ पौर्णिमा यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर

धामणी(ता.आंबेगाव) खंडोबा मंदिराला थोरात बंंधूची विनामूल्य आकर्षक रोषणाई!!

माघ पौर्णिमा यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर!!

धामणी (ता.आंबेगाव ) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात माघ पौर्णिमेच्या (माही पुनव)यात्रेत २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीला पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील विरा लाईटस अँड इव्हेंटस मँनेजमेंटचे थोरात बंधूच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी विनामूल्य आकर्षक विद्युतरोषणाई करणार असल्याचे धामणी ग्रामस्थ व देवस्थानाचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

धामणी येथील खंडोबा देवस्थान हे पुणे,नगर आणि नाशिक जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असून माही पुनवेच्या यात्रेला खंडोबाचे दर्शनासाठी व पाचनामाचे जागरणासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. पाडळी आळे ( ता.पारनेर) येथील विरा लाईटस अँड इव्हेंटस मँनेजमेंटचे संर्वेसर्वा श्री विजयभाऊ थोरात व श्री अर्जुनभाऊ थोरात आणि कुटुंबियाचे धामणीचे खंडोबा देवस्थान कुलदैवत असून त्यांनी मागील वर्षापासून (२०२३)सलग पाच वर्षे यात्रेच्या कालावधीत विनामूल्य विद्युत रोषणाई करण्याची व कुलस्वामी खंडेरायाच्या सेवेची संधी देण्याची विनती धामणी ग्रामस्थांकडे व देवस्थानाच्या सेवेकरी मंडळीकडे केलेली होती.मागील वर्षीच्या यात्रेत त्यांनी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी झालेली होती.भाविकांनी व ग्रामस्थांनी या रोषणाईचे भरभरुन कौतुक केलेले होते.

याही वर्षीच्या यात्रेत ते विद्युतरोषणाई विनामूल्य करणार असल्याचे देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत यांनी सांगितले.श्री थोरात बंधू हे अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द लाईट अँड मंडप व डीजे सिस्टीमचे संचालक असून पारनेर व जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीजवळील बेल्ह्रा गावाजवळील पाडळी आळे येथील असून या गावातील थोरात आडनावाची मंडळी दरवर्षी माही पुनवेच्या यात्रेला दर्शनासाठी व देवकार्य करण्यासाठी आवर्जुन येत असतात. कुलदैवत श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या यात्रेत विनामूल्य विद्युतरोषणाई करुन सेवा करणार्‍या आळे पाडळीच्या श्री विजयभाऊ थोरात व श्री अर्जुनभाऊ थोरात या बंधूच्या सेवाभावी श्रध्देचे व निस्सीम भक्तीचे पंचक्रोशीच्या गावातील भाविकांनी व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.