आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ऊस संशोधन केंद्र लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे आंबेगाव व जुन्नरच्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न.!!

ऊस संशोधन केंद्र लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे आंबेगाव व जुन्नरच्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न.!!

प्रतिनिधी – समीर गोरडे (शिंगवे पारगाव ता.आंबेगाव)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण केंद्र लखनऊ येथे आयोजित करण्यात आले.सदरील प्रशिक्षणास आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

ऊस संशोधन केंद्र लखनऊ येथे संशोधन केंद्राचे डायरेक्टर डॉ.विश्वनाथन यांनी संस्थे विषयी मार्गदर्शन केले, डॉ.मृत्युंजय कुमार सिंह प्रमुख शास्त्रज्ञ यांनी ऊस पिकासाठी यांत्रिकीकरणाचा वापर या विषयी मार्गदर्शन केले. डॉ.संजीव कुमार प्रमुख शास्त्रज्ञ यांनी टिशुकल्चर द्वारे रोपे निर्मिती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.महाराम सिंह प्रमुख शास्त्रज्ञ किड व रोग व्यवस्थापन यांनी ऊस पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ.दिलीप कुमार प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रक्रिया यांनी गुळ उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले.

डॉ.आदित्य प्रकाश द्विवेदी प्रमुख शास्त्रज्ञ यांनी ऊस पिकासाठी पाणी व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन ऊस उत्पादवाढीसाठी ते करत असलेल्या यशोगाथा प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती घेतली.

या प्रशिक्षणासाठी आलेल्या जुन्नर,आंबेगावच्या शेतकरी मधून ऊस भूषण शेतकरी विकास चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना आत्मा कृषी विभागाचे आभार व्यक्त केले.सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊस संशोधन केंद्राचे डॉ.कामता प्रसाद प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विस्तार , डॉ. जुबेर सर व आत्माचे धोंडीभाऊ पाबळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव पुणे यांनी योगदान दिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.