मेंगडेवाडी(ता.आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात साजरी!!

मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!!
मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) यथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाराजांच्या पुतळ्याभोवती रांगोळी काढण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत मेंगडेवाडी कार्यालयात महारजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे,युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी,उपसरपंच सुजाता मेंगडे, चेअरमन तुकाराम भोर, दत्तात्रय मेंगडे, रंगनाथ गवारी, रेश्मा गवारी, पोपटराव मेंगडे, भास्कर मेंगडे, संदिप गवारी, अशोक वायाळ, जयसिंग मेंगडे, रुपाली मेंगडे,कल्पना मेंगडे पोलीस पाटील नितीन मेंगडे, नवनाथ दांगट, दिपक गायकवाड, संजय चक्कर, तेजस मेंगडे, विठ्ठल मेंगडे, पियुष मेंगडे आणि शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते.