जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, भिवंडी मेडिकल प्रॅक्टीस असोसिएशन, वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!!

जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, भिवंडी मेडिकल प्रॅक्टीस असोसिएशन, वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!!
शहापूर- शहापूर तालुक्यातील मोहिली -अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात “जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, भिवंडी मेडिकल प्रॅक्टीस असोसिएशन, वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.यात विविध नामांकित संस्थेच्या डॉक्टरांनी सहभाग घेत एक दिवस समाज उपयोगी कामासाठी देत सामजिक दायत्वी जपत त्यांनी २०००हून अधिक विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी केली व मोफत औषधी वितरण केले. यात विद्यार्थ्यांचे नाक,कान,डोळे त्वचा विकार, हाडाचे आजार, तसेच स्त्रीवैद्यकीय तज्ञ व विविध प्रकारच्या रोग विकार तज्ञांचे मार्गदर्शन व समोपदेश केले.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, भिवंडी मेडिकल प्रॅक्टीस असोसिएशन, वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन, स्वधर्म फाऊंडेशन, रूद्रा फाउंडेशन, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल व्यवस्थापन समिती यांनी केले.सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन एम.एच.साबू सिद्दिक पॉलिटेकनिकचे विभाग प्रमुख मनोज देशमुख, प्रा.अर्शद कादरी ( विद्यार्ध्यासह) केले. वागळे एस्टेट डॉक्टर ओएससीएशन चे अध्यक्ष डॉ तिवारी, डॉ यादव व अन्य नामांकित तज्ज्ञ, भिवंडी येथील डॉ नूर खान, श्री जैन व अन्य मान्यवर, नानावती हॉस्पिटल चे डॉक्टर पायल व शिफा इत्यादी अनेकांनी तपासणी साठी परिश्रम घेतले.
आत्मा मालिक ध्यानपिठाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, व्यवस्थापक गुलाब हिरे,यांनी खोस्ते ग्रामपंचायत सरपंच नयना भुसारे व पोलीस पाटील बळीराम ठाकरे यांना प्रतिनिधिक स्वरूपात ओषधे देऊन वाटप करण्यात आले.तसेच या शिबिराचा लाभ विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला याबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी सर्व डॉक्टर टीमचा सन्मान करण्यात आला. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब उपाध्यक्ष भगवानराव दौंड साहेब सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब व विश्वस्त तथा कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब तसेच समस्त विश्वस्त मंडळ यांनी आभार मानले.