आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी शाखेत पालक सभा संपन्न!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी शाखेत पालक सभा संपन्न!!
शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत भारतमाता व संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारजी सूर्यवंशीसाहेब, समस्त विश्वस्त मंडळ, विश्वस्त तथा स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी शाखेत पालक सभा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चचे प्राचार्य डॉ. डी.डी शिंदे सर उपप्राचार्य गोविंद चव्हाण सर आदी.मान्यवरसह विविध विभागचे विभागप्रमुख उपस्थित होते.पालक सभेला आलेल्या सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्रगतीबाबत व शैक्षणिक यशाबद्दल पालकांना माहिती देण्यात आली. तसेच या शैक्षणिक वर्षात कॉलेजला आयएसओ मानांकन व नॅक मानांकन प्राप्त झाले तसेच विद्यार्थ्यांसाठी IBM व Six Ledders कोर्सेस करून भविष्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नौकरीच्या संधी बाबत करियर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पालक सभेवेळी पालकांनी विचार मांडत विविध उपक्रमांनाबाबत व शैक्षणिक संकल्पने बाबत संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाची आभार प्रदर्शन डॉ सुर्यकांत चांदगुडे सर यांनी केले.यावेळी पालक सभेसाठी असंख्य पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याकार्यक्रमसाठी डॉ सचिन मुंडे, प्रा. नरेश शेंडे,सोनाली पाटील,सोनिया कदम, दिपाली देसले,यांनी अथक परिश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमांद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब उपाध्यक्ष भगवानराव दौंड साहेब सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब व विश्वस्त तथा कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब तसेच समस्त विश्वस्त मंडळ यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.