आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

भय इथले संपत नाही!!जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरात कैद!!घरासमोरून कुत्रा उचलून नेऊन कुत्र्याचा पाडला फडशा!

भय इथले संपत नाही!!जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरात कैद!!

घरासमोरून कुत्रा उचलून नेऊन कुत्र्याचा पाडला फडशा!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहावयास मिळाला आहे. जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील ह.भ.प. बाबुराव महाराज ढोबळे यांच्या घरासमोरील आवारात बिबट्याचा मुक्त संचार पाहावयास मिळाला. घराच्या आवारात असलेल्या कुत्र्याला उचलून नेऊन बिबट्याने त्याचा फरशा पाडल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

जारकरवाडी परीसरात ऊस तोडणी सुरू आहे.यामुळे बिबटे अन्नाच्या शोधात लोकवस्तीत येत आहेत. या परिसरात त्वरीत पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.