आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न!!

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न!!
—————–

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन आज जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रकल्प संचालक जल जीवन मिशन श्री.पंडीत राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. पाच तालुक्यातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेले कनिष्ठ व वरिष्ठ गटातील एकूण ३० स्पर्धकांनी आज उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.

यावेळी डॉ. प्रविण काळे, पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महिला विद्यापीठ मुंबईचे डॉ.अमोल उबाळे यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. अनिल निचीते, सुत्रसंचलन श्रीम. प्रमिला सोनवणे यांनी केले. वैद्यही वेखंडे, सुरेखा त्र्यामणपाटी, संतोष निचीते, निलेश मोरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपुर्ण सहकार्य केले आहे.

पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती या विषयावर स्पर्धकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विषयांची उत्तम मांडणी केली.

वक्तृत्व स्पर्धा बक्षीस व पारितोषिक स्वरुप-कनिष्ठ व वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकास 21 हजार रु. धनादेश रक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकास 11 हजार रु. धनादेश रक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास 5 हजार 500 रु. धनादेश रक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र याप्रमाणे राहिल. स्पर्धकांची निवड झाली असून लवकरच बक्षिस वितरण कार्यक्रम करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प संचालक जल जीवन मिशन श्री.पंडीत राठोड यांनी दिली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.