आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

अरे व्वा!! बैलाच्या प्रेमापोटी बैलाच्या मालकाने उभारले बैलाचे स्मारक!!!

निस्वार्थ प्रेम!!!
दोन दिवसांपूर्वी येणेरे गावच्या डोंगर भागात फिरतीला एका शेतातुन जात असताना शेतातील बांधावर आंब्याच्या झाडीमध्ये हे शेडमध्ये बैलाचे स्मारक निदर्शनास पडले. याबाबत अधिक माहिती घेण्याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली होती. एका शेतकऱ्याने या बैलाला शेतात स्मारकाच्या रूपात का बरं स्थान दिले असावे? असा प्रश्न मीच मला विचारू लागलो. उत्तर मिळणे अवघड होते त्याचा शोध चालू झाला. बाबु घोगरे यांनी याचे उत्तर श्री. सचिन सिताराम घोगरे बाबांकडे मिळेल सांगितले. आखिर घोगरे बाबांच्या समोर जाऊन मी उभा राहिलो व त्यांच्या जवळ उत्तर मिळाले व अंगावरचा रोम रोम पुलकित झाला.
बाबांना बैल स्मारका विषयी विचारले तर त्यांच्या अंगात १०० हत्तीचे बळ संचारले. माझा पिंट्या अतिशय गुणी त्यानंतर अनेक बैल शोधले परंतु पुन्हा पिंट्या जन्माला येणं नाही अगदी डोळ्याच्या कडा पान्हावत बाबांनी उद्गार काढले. खरंच जग सोडून गेलेल्या या मुक्या जनावराच प्रेम बाबांच्या वाणीतुन आज अनुभवायला मिळाले. सगळ्यांना मारणार पिंट्या अगदी मी समोर जाताच तो शाळेतील आदर्श विद्यार्था सारखा वागताना दिसे. गावात जर पिंट्याला मोकळा सोडला तर शेतातील पाऊलवाटेने कुणाच्या मालाचा त्याने घास कधी घेतला नाही की कुणाच्या शेतात त्याने पाऊल ठेवला नाही एवढा मानसांपेक्षा तो समजदार होता. गावकरी त्याला ह.भ.प कोंडाजी बाबा डेरे यांच्या पालखीचा मान पंढरपूर पर्यंत गाडीला जुंपुन द्यायचे. गावातील गाडा शर्यतीत पण जुंपायला स्वतः जुकाटात मान ठेवणारा पठ्ठ्या होता.
या बैलाला मी शेवटपर्यंत विसरू नये व तो सतत माझ्या सोबत शेतात असावा याची जाणीव व्हावी म्हणून मी त्याचे स्मारक शेतात बांधले असे बाबा सांगतात. खरोखरच मालक आणि बैल यांचे किती एकमेकांवर निस्वार्थ प्रेम असेल याची प्रचिती प्रत्यक्ष आज पहायला मिळाली. अनेक ठिकाणी फिरलो परंतु शेतीत नांगराला जुपणा-या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारा बळीराजा आज मात्र प्रथम पहायला मिळाली हे माझे भाग्यच. मनोमन बाबांना त्रिवार मानाचा मुजरा केला त्यांचं ते निस्वार्थी अबोल प्रेम पाहून कारण बैलाकडुन चाबकाचे फटके मारून काम करून घेणारे व बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत नावलौकिक मिळविणारे अगणिक पाहीले परंतु बैल मेल्यानंतर ३०/४० हजार रुपये खर्च करून त्या बैलाच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी स्मारक बांधणारा अबोल प्राण्यांवर प्रेम करणारा हा येणेरेगावच्या घोगरे परीवारातील बळीराजा मात्र प्रथमच पाहिला.
✍️ छायाचित्र – रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.