आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

श्री ओंकार गिरीजी यांची २५० वर्ष भुमिगत समाधी गुंजाळवाडी (बेल्हे)

साभार लेख - माजी सैनिक श्री.रमेशजी खरमाळे

श्री ओंकार गिरीजी यांची २५० वर्ष भुमिगत समाधी गुंजाळवाडी (बेल्हे)

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी (बेल्हे) येथील भुमिगत समाधीला भेट देण्याचा योग आला. जुन्नर तालुक्यातील ही एकमेव भुमीगत समाधी असावी असा मला वाटते.
श्री ओंकार गिरीजी यांची भूमिगत समाधी शके १६९४ इसवी सन १७७२ नंदनानसंवत्सरे मार्गशीष शुद्ध १३ दिवशी बांधण्यात आली. ही समाधी मातीच्या भांड्यात रचण्यात आली होती. आपण जुन्नर शहराजवळील पाताळेश्र्वर मंदिर पाहिले असेलच याच पध्दतीत हे समाधीस्तल असुन पाच सहा पाय-या उतरुन आपणास आतमध्ये बसून प्रवेश करत समाधी मंडपात पोहचता येते व समाधीचे दर्शन घडते. २०२१ मध्ये माती भेंड्यांची रचना मोडकळीस आल्याने स्थानिकांच्या माध्यमातून नव्याने हे समाधीस्तल निर्माण करण्यात आले. पाय-यावर पत्र्याचे झाकण व समाधी डोमावर पत्र्याचे शेड बांधून समाधीस्तल सुरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ३०० ते ४०० वर्षे जुन्या आठवणीतील ऐतिहासिक अनेक समाध्या पहायला मिळतात.
गुंजाळवाडी जवळच आपणास डोंगर माथ्यावर असलेले दावलमालीक बाबा व आदिनाथ महादेव बाळेश्वर मंदिर प्रसिद्ध असुन असंख्य पर्यटक येथे भेटीसाठी गर्दी करत असतात. कधी गुंजाळवाडी (बेल्हे) गेलात तर येथे आवश्य एकदा भेट द्याच
✍️📷 रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.