खडकी पिंपळगाव शाळेतील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप!!
खडकी पिंपळगाव शाळेतील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
खडकी (पिंपळगाव) येथील काळभैरवनाथ,सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात नांदी फाउंडेशन अंतर्गत नन्ही कली उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गातील 90 विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
नांदी फाउंडेशनच्या या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुलींना दरवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. या फाउंडेशनची स्थापना१९९६ साली महिंद्रा ग्रुपच्या माध्यमातून झालेली असून नन्ही कली हा उपक्रम भारतात २१ राज्यात सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात हा उपक्रम २०१९ सालापासून सुरू झाला असून या उपक्रमामध्ये विद्यालयातील मुलांना आणि मुलींना विविध जीवन कौशल्ये, संवाद कौशल्ये तसेच आर्थिक कौशल्ये यांचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाच्या माध्यमातून मुलींमधील नेतृत्वगुण आणि टीमवर्क विकसित केले जाते.
विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या ९० विद्यार्थिनींना नांदी फाउंडेशनच्या वतीने शूज,टी-शर्ट,सॉक्स, वही,पेन,बॅग,शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दादाभाऊशेठ पोखरकर संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, दत्तात्रय बांगर सरपंच खडकी (पिं),प्राजक्ता बांगर उपसरपंच खडकी (पिं),दीपक बांगर,भरत पोखरकर,पांडूरंग पाटील,कृष्णाजी भोर,विकास पोखरकर, संतोष शिरसाठ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील शिक्षक संजीव पिंगळे,रामकृष्ण राजगुरू, मंगल सोनार, रूपाली ठाकूर,माधुरी थोरात,धम्मपाल कांबळे,बाळासाहेब विधाटे, संतोष खालकर,रामदास लबडे, रामदास भांड,निलेश भालेराव आदींनी पाहिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्योत्स्ना खेडकर यांनी केले,आभार प्रभाकर झावरे यांनी मानले.