आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली – अघईत तीनदिवसीय ध्यान योग शिबिर उत्साहात संपन्न!!
आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली – अघईत तीनदिवसीय ध्यान योग शिबिर उत्साहात संपन्न!!
शहापूर – शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई तानसा धरणाच्या बाजूस विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण) संचालित,आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक ध्यानयोग मिशन द्वारा , परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशिर्वादाने संत परिवाराच्या प्रेरणेतून तसेच समस्त विश्वस्त मंडळ व स्थनिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक ध्यानपीठ मोहिली – अघई येथे तीनदिवसीय ध्यान योग शिबिर दि २७ ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी भजन, ध्यान साधन, हरिपाठ सत्संग , सदगुरू दर्शन, व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माऊलिंच्या दिव्य सानिध्यात , संत परमानंद महाराज व समस्त संतानी मधुर वाणीने प्रवचन रुपी सेवा दिली. संत परिवाराच्या दिव्य सानिध्यामध्ये असंख्य साधक व आत्माप्रेमी भाविक तीन दिवसीय ध्यान योग शिबिराचा लाभ घेतला. सरत्या वर्षाला निरोप देत सत्संग समारोह असल्याने परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या दिव्य सानिध्यामध्ये आत्मप्रेमी भाविकांना सुख-शांती करिता ध्यानसाधना करण्याचा योग प्राप्त झाला.
प. पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या दिव्य सानिध्यात आत्मा मालिक ध्यानपिठात वार्षिक सत्संग समारोह असल्याने भाविकांनी आपले जीवन कृतार्थ करण्यासाठी पावन संधीचा लाभ घेतला यावेळी असंख्य देश – विदेशातील आत्मप्रेमींना भाविक उपस्थित होते.
परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली,संत परिवार व संत भारत माता,संस्थेचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे आत्मा मालिक ध्यानपिठाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव विश्वस्त, विश्वस्त उदय शिंदे, मोहन शेलार, प्रकाश भट, प्रकाश गिरमे ,विलासराव पाटील (आक्रे), अभिजित पाटील (अंभई), अनंत गायकवाड प्रवीण मोरे , भारत सलगर,अलोकनाथ महाराज, ह.भ.प चिंतामण गोधडे महाराज आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच भाविक व सेवाचारी, आत्मसेवक आत्मप्रेमी तसेच संकुलातील विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी यांनी ध्यान सत्र, भजन याचा लाभ घेतला. स्वरांजली ग्रुपने कृष्णा नरोडे,समाधान चव्हाण, संगितविशारद सुयोग खांडगळे, समाधान काटे, नरेंद्र गोसवी आदींनी सेवा सादर केली.तसेच कार्यकम यशस्वी करण्यासाठी संकुलाचे पदाधिकारी ,शैक्षणिक व्यवस्थापक प्राचार्य डॉ डी डी शिंदे,जनरल व्यवस्थापक उल्हास पाटील, सेवा व जनसंपर्क व्यवस्थापक गुलाब हिरे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर ,प्राध्यापक, विभाग प्रमुख ,सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.