जवळे (ता.आंबेगाव) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!! ऋषिकेश संजय खालकरची सी. ए. ला गवसणी!!
ऋषिकेश खालकरची ‘ सी.ए ‘ ला गवसणी!!
जवळे (ता.आंबेगाव ) येथील ऋषिकेश संजय खालकर याने आपल्या परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सीएच्या (सनदी लेखापाल ) परिक्षेत यश मिळवले.पहिल्याच प्रयत्नात सीएची परिक्षा पास झाल्याबद्दल जवळे आणि निरगुडसर परिसरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपनापासून अभ्यासात हुशार असलेल्या ऋषिकेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद जवळे व पुढील शिक्षण पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर येथे पूर्ण केले. अकरावी, बारावी,बी.कॉम व एम.कॉमचे शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे झाले.एम.कॉम करत असतानाच त्याने सीएचा अभ्यास केला.आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी सीए होण्याचा मान मिळवून सीएला गवसणी घातली.
संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणार्या सीएची परिक्षा उतीर्ण होऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला.ऋषिकेशचे वडील शेतकरी असून शेतीला मदत म्हणून गॅस वितरण व्यवसाय करत आहेत.परस्थिती सर्वसाधारण असून सुद्धा मुलाला उच्च शिक्षण देण्याची त्यांची जिद्द होती आणि ती त्यांनी पूर्ण केली . यासाठी त्यांची पत्नी सुरेखा हिने सुद्धा मुलाला मोठे करण्यासाठी आपल्या पतीला मोलाची साथ दिली.
या यशाबद्दल ऋषिकेश म्हणाला कि पुण्याला बारामती हॉस्टेल येथे राहून बारा-बारा तास अभ्यास केला.अभ्यास करताना आईवडीलांचे कष्ट व घरची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला.व आई वडील, भाऊ चुलते संतोष खालकर यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा निश्चित मोठा आनंद आहे. ऋषिकेशला मिळालेल्या यशाबद्दल माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जेष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्याक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील व गावचे सरपंच , उपसरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.