आरोग्य व शिक्षणसामाजिक

श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला-संस्थापक,अध्यक्ष मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला-संस्थापक,अध्यक्ष मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण!!

केवळ नफा कमावणे हाच उद्देश न ठेवता, सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी भैरवनाथ पतसंस्था नेहमीचं अग्रेसर राहिली आहे.श्री भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला आहे.पतसंस्थेने अत्यल्प व्याजदरात गरजु व होतकरू तरुणांना वित्त पुरवठा केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष,म्हाडाचे सभापती मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनंदिनी, टेबल बुक, दिनदर्शिकाचे प्रकाशन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह 17 शाखा आहेत.संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन असून पतसंस्थेकडे आज अखेर 471कोटी रुपयांच्या ठेवी असून 382 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.152 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. निधी 52 कोटी,भागभांडवल 6 कोटी असुन संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सागर काजळे यांनी दिली.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,संचालक हनुमंत तागड,योगेश बानखेले,राम तोडकर,अशोक गव्हाणे,शोभा आवटे, अभिमन्यू लांडगे,भिकाजी बोकड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे,भाजपचे डॉ.ताराचंद कराळे,अरूण गिरे,सुनिल बाणखेले,अशोक बाजारे,शाम गुंजाळ, तानाजी शेवाळे उपस्थीत होते.

संचालक योगेश बाणखेले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.