ग्लोबल फोकस ऑलिम्पियाड (GFO) स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूर मधील विद्यार्थ्याचे घवघवीत यश!!
ग्लोबल फोकस ऑलिम्पियाड (GFO) स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूर मधील विद्यार्थ्याचे घवघवीत यश!!
ठाणे – यंदाच्या वर्षात, ग्लोबल फोकस ऑलिम्पियाडमध्ये ( सन २०२४-२५) भारतातील सात राज्यांमधील १५० शाळांमधून ३०,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी फक्त ६,५०० विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली असून त्यापैकी ४४ विद्यार्थी आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, शहापूरमधील आहेत. यातील प्रत्येक विद्यार्थ्याने अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात चमकदार कामगिरी केली आहे आणि आपली क्षमता सिद्ध केली आहे. यातून १० विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतभर राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालीं. सिद्धी बालाराम कनोजे, परिणीती कैलास मोरे, वेदिका भूषण भानुषाली, देवांश श्रीकांत राणे, प्रणित जितेंद्र चिपकर, वैभवी अमोल जंगाटे, मनस्विनी धर्मेंद्र प्रजापती, शौर्य रोहिदास भोईर, सक्षम संतोष काशीद, मैत्रयी योगेश पाटील यांची निवड झाली. यामधून इयत्ता चौथीची विद्यार्थीनी कुमारी मनस्विनी प्रजापती ही प्रथम क्रमांक व ट्रॉफीची मानकरी ठरली असून इयत्ता सातवीमधून कुमार सक्षम काशीद या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक व मेडलचा मानकरी ठरला आहे. तसेच ऑफ लाईन परीक्षेत प्रणित जितेंद्र चिपकर यांनी विशेष कामगिरी केली आहे.
या विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या आशिर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष, व समस्त विश्वस्त मंडळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष, स्थनिक सदस्य यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धेत प्रावीण्य मिळविले. याबद्दल दोन्ही विद्यार्थिनी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य कैलास थोरात, मार्गदर्शक राजश्री अबनावे तसेच वर्गशिक्षक कांचन वाघ , किरण चोरामले यांनी अथक परिश्रम घेतले.