श्री.मनोहर हरिचंद्र पोखरकर घरातून निघून गेला आहे.
आढळून आल्यास नितीन पोखरकर ७७७४०८०६२६ या नंबरवर संपर्क साधावा
घरातून निघून गेला आहे.
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील मनोहर हरिचंद्र पोखरकर (वय-५२ वर्षे) हे कोणाला काही न सांगता अकरा दिवस झाले घरातून निघून गेले आहेत.या संदर्भात त्यांची पत्नी संगिता मनोहर पोखरकर यांनी पारगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास पारगाव पोलिस करत आहेत. या संदर्भात समजलेली माहिती अशी की मनोहर पोखरकर हे गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले आहेत.ते आजतागायत घरी आले नाही. माझे दिर दत्तात्रय हरिचंद्र पोखरकर यांनी त्याला मोबाईल वरून ( भ्रमण दूरध्वणीवरून ) संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.या संदर्भात आम्ही त्यांचे मित्र आमचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता मनोहर आमच्याकडे आला नाही असे सांगितले. मनोहर पोखरकर यांचे शिक्षण दहावी झाली असून, उंची पाच फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ , अंगात फूल बाह्याचा लाल रंगाचा शर्ट टिशर्ट,राखाडी रंगाची फुल पॅन्ट घातली असून,त्यांना दारू पिण्याचे व्यसन असून ते मराठी व हिंदी भाषा बोलत आहेत.सदर व्यक्ती कोणाच्या नजरेस आली तर नितीन पोखरकर ७७७४०८०६२६/ नंबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री.मनोहर रामचंद्र पोखरकर