आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर!!खेड्यापाड्यातील ही गणेशमूर्ती महागणार!!

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर!!खेड्यापाड्यातील ही गणेशमूर्ती महागणार!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची लगबग वाढली असून, मूर्ती तयार करण्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. यंदा कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्के भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजुरांच्या मजुरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक गणेश मंडळे पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपये किमतीच्या मूर्ती विकत घेतात, असे गावडेवाडीचे मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी सांगितले. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्था, रंग, विविधरंगी खडे यांच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे मूर्तीच्या दरातही वाढ होणार आहे. मोठी मूर्ती खरेदी करण्यावर गणेश मंडळांचा भर असल्याने, आता लहान मूतींना फारशी मागणी नसते. त्यामुळे मूर्तिकारदेखील मोठ्या मूर्ती तयार करण्यावर भर देतात, असे राजगुरू यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिला गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यात मजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात; परंतु, यंदा पावसामुळे बाजारपेठेत विशेष उत्साह असल्याने त्यांच्या मजुरीवर जादा मिळण्याची  शक्यता आहे, याकडेही राजगुरू यांनी लक्ष वेधले.गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्रीधर राजगुरू आपल्या सहकाऱ्यांसमवेत गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याच्या लगबगीत व्यस्त आहे

गणेशाचे आगमण काही दिवसांवर-गणेशोत्सव काही दिवसांवर येथून ठेपला आहे. त्यामुळे मूर्ती कारागीर गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याच्या लगबगीत आहेत. दिवसेंदिवस वाढती महागाई उग्ररूप धारण करत असल्याने त्याचा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना एकशे ‘एक रुपयांपासून अगदी २१ हजारांरुपयांपर्यंत गणेशमूर्ती आमच्या मार्फत पुरविल्या जातात. मात्र या वर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह व चैतन्य आहे त्यामुळे मोठमोठ्या मूर्ती नाही मागणी आहे असे मूर्ती कारागीर सांगतात  दिवसेंदिवस काठीण होत असलेल्या या गणेशमूर्ती व्यवसायास शासनाने हातभार लावावा, अशी माफक अपेक्षा  श्रीधर अप्पा राजगुरू व्यक्त करतात.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारागीर गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत आहेत.गावडेवाडी येथील गणेश मूर्ती कारखान्यातील चित्र ..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.