आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैजनाथ येथे अभ्यास दौ-याचे आयोजन!!

आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैजनाथ येथे अभ्यास दौ-याचे आयोजन!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत राज्या अंतर्गत शेतकरी सहलीचे आयोजन श्री संजय काचोळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा पुणे व श्रीधर काळे प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे,श्री नरेंद्र वेताळ तालुका कृषि अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 परळी वैजनाथ येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास आंबेगाव तालुक्यातील एकूण 55 शेतकरी स्त्री व पुरुष यांनी भेट देऊन शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञाना विषयी माहिती व प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली.

शेतक-यांनी देशी बी-बीयाणे स्टाँल,ठिबक सिंचन स्टाँल, शासकीय विभागाच्या विविध स्टाँलला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन धोंडीभाऊ पाबळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव,ज्ञानेश्वर लोहकरे,अमोल खमसे कृषी सहाय्यक यांनी केले सदर कार्यक्रमासाठी मुक्तादेवी व संकल्प, महालक्ष्मी, वडजुमाता महिला बचत गटातील महीला शेतकरी व शिवभावे जीवसेवा शेतकरी उत्पादक कंपनी प्रतीनिधी, शिवप्रसाद आदिवासी नैसर्गिक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी प्रतीनिधी,वनदेव सेंद्रिय शेतकरी गट प्रतीनिधि व समिर गोरडे,अनिल वाघ,बाळु बेंढांरी, संतोष गभाले, सुदर्शन करंडे,सतेज दातखीळे व इतर शेतक-यांनी सहभाग घेतला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.