आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पत्रकार संतोष वाव्हळ यांची राज्य संघटनेच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती!!

पत्रकार संतोष वाव्हळ यांची राज्य संघटनेच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती!!

ठाणे ता २१ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची दिक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा ठाण्यात दाखल झाली असता ठाणे विभागाच्या वतीने मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. कळवा नाका येथील शिवरायांच्या पुतळ्याला व कोर्ट नाका येथील डॉ. आंबडेकर यांच्या पुतळ्याला मानवंदना झाल्यावर गुरुद्वारा येथील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत कोकण विभाग उपाध्यक्ष पदी पत्रकार संतोष वाव्हळ यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी सोपविण्यात आली.

पत्रकार संतोष वाव्हळ यांचा नवी मुंबईतील कोकण विभागामधील अनेक राजकीय सामाजिक तसेच शासकीय यंत्रणे बरोबर मोठा जनसंपर्क आहे. साप्ताहिक लोकदृष्टी मधून आपली सुरुवात झाली त्यानंतर ट्विन्स सिटी टाइम्स, वाशी टाइम्स, पुढारी, तरुण भारत तसेच विविध साप्ताहिक वृत्तपत्र मध्ये काम करत असताना खारघर पत्रकार संघ रजि करून त्यांनी संस्थापक व सचिव पदावर कार्यरत असून तसेच पनवेल येथील क्रियाशील प्रेस क्लब या संस्थेमध्ये काम करत असताना खारघर भूषण हा पुरस्कार मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते सर्वप्रथम मिळाला असून अनेक संस्थाकडूनही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पनवेल उदय व सार्थ लोकनिती साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्यावर संतोष वाव्हळ यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसंगी नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण, पनवेल महानगर पालिका क्षेत्र – शैलेश चव्हाण, पनवेल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.