आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लायन्स क्लब अलिबाग डायमंड व प्रयास हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कार्लेखिंड येथे उभारले बसस्थानक !!

लायन्स क्लब अलिबाग डायमंड व प्रयास हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कार्लेखिंड येथे उभारले बसस्थानक !!

लायन्स क्लब अलिबाग डायमंड व प्रयास हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कार्लिखिंड येथे बस स्थानक उभारण्यात आले आहे.या बसस्थानकाचा उद्‌घाटन सोहळा १६ ऑगष्ट रोजी लायन्स डिस्ट्रीक्ट गव्हर्नर लायन एन.आर. परमेश्वरन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रथम प्रांतपाल लायन संजीव सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी लायन किर्ती सुर्यवंशी,द्वीतीय प्रांतपाल लायन प्रविण सरनाईक व त्यांच्या पत्नी लायन श्रुती सरनाईक,माजी प्रांतपाल लायन अनिल जाधव,रिजन चेअरमन लायन विजय वनगे, झोन चेअरमन लायन प्रितम गांधी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा लायन डॉ.रेखा म्हात्रे यांनी सांगीतले की,इथून खूप प्रवासी प्रवास करतात पण इथल्या थांब्याला निवारा नसल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचदा कडक उन, मुसळधार पावसात गाडीची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागे.अशावेळी वृद्ध किंवा आजारी प्रवाशांचे हस्त हाल होत,म्हणून डायमंड क्लब ने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयास हॉस्पिटलच्या मदतीने निवारा शेड उभारली.त्याच सोबत प्रयास हॉस्पिटल गोठेघर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णोपयोगी साहित्य सेवाकेंद्र व नेत्रचिकीत्सा सेवा केंद्राचे गवर्नर सरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी डायमंड क्लबच्या पदाधिकारी व सदस्या तसेच परिसरातील प्रतिष्ठीत लायन्स सदस्य व पदाधिकारी,माणूसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान,तेजस्वीनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.जीवीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते,

या उपक्रमांबद्दल समाजातील अनेक स्तरातून डायमंड क्लबचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.