आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रक्षाबंधननिमित्त सजल्या बाजारपेठा; राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी!!

रक्षाबंधननिमित्त सजल्या बाजारपेठा; राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

पारगाव शिंगवे गावानमध्ये रक्षांबंधनासाठी राख्यांच्या दुकानाने बाजारपेठ सजली आहे .राख्यांच्या दुकानामध्ये आपल्या भाऊरायांकरीता राखी खरेदीसाठी बहिणींनी दुकांनमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळाली. बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे परीसरातील बाजारपेठ फुलून निघाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकीकडे आपल्या भाऊरायाच्या पसंतीस उतरेल, अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती, तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवावर्ग व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहीण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सोमवारी साजरा झाला. मात्र यंदा महागाईमुळे दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपारिक गोंडा राख्यांसह विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. कमीतकमी पाच ते दहा रुपयांपासून अगदी ५० ते ६० रुपये आणि त्याहूनही अधिक किमतीच्या विविध प्रकारच्या राख्या रक्षाबंधननिमित्त बाजारपेठेत उपलब्ध आहेत. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने विविध लहान-मोठी राखीची दुकाने सजल्याचे दिसत आहे. बाहेरगावी तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरायांना पोस्टाने वेळेत राखी पोहोचण्यासाठी आधीपासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. जेणेकरून चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे. दुसरीकडे व्यावसायिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ५० टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली.

यंदा राख्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी राख्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. मात्र तरीही राखी खरेदीसाठी महिलावर्ग दुकानात गर्दी करत आहेत. त्यामुळे यावर्षीही बाजारपेठेत सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.


कुंदन वर्क, साध्या राख्यांना मागणी..
व्यवसायिक-योगेश तागड,गणेश शेवाळे

चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. दरम्यान, राख्यांमधील नावीन्यता म्हणजे गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी बाजारात आल्या आहेत.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.