आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ती’ ही आर्थीक दृष्ट्य मजबुत होईल तेव्हाच खरे महिला सक्षमीकरण- प्रेरणा बलकवडे

ती’ ही आर्थीक दृष्ट्य मजबुत होईल तेव्हाच खरे महिला सक्षमीकरण- प्रेरणा बलकवडे

नाशिकः महिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभी रहाते तेव्ही तिच्यात एक आत्मविश्वास येतो या संकल्पनेतून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या वतिने भगूर शहरातील एकल महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात आले. तसेच गरजु शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे तसेच गोरखनाथ बलकवडे, राजाराम धनवटे, सोमनाथ बोराडे, योगेश निसाळ, बाळासाहेब म्हसके यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याच्या उपमुख्यमंत्री आजीत पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

भगूर शहरातील बलकवडे अंतराष्ट्रीय क्रीडा संकूल येथे आज कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व विशाल बलकवडे यांच्या झेप फाऊंडेशनच्या वतिने १०० गरजु-एकल महिलांना १ महिन्याचे प्रशिक्षण देऊन या शिलाई मशीन देण्यात आल्या. महिलांना घरा बाहेर न पडता आर्थीक दृष्टीने मजबुत करण्यासाठी पुढे या महिलांना शिलाई कमे देखील दिली जाणार आहेत.भगूर शहरातील एकल व शोषित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम पुढे देखील चालु राहील असे प्रेरणा बलकवडे यांनी बोलताना सांगीतले. भगूर शहरातील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

महायुती सरकार कडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी उपस्थित लोकांना दिली. उद्योजक व आजमेरा इंडस्ट्रीजचे चेअरमन चिंतन आजमेरा यांच्या कडून महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन कार्यक्रमात देण्यात आले.


कार्यक्रमाची प्रस्तावना प्रेरणा बलकवडे व आभार विशाल बलकवडे यांनी मानले. प्रस्तावना निशा पुजारी यांनी केली. महिलांना सर्व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सायरा शेख, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, निलेश गोरे, वैभव खांडबहाले, प्रेमलता राजगुरु, मुन्ना अन्सारी, प्रसाद आडके, कैलास भोर, विलास कुलकरणी, युनुस शेख, सुनील जाधव, दिगॅबर ससाणे, शाम देशमुख, विलास कासार, रोशन चौधरी यांच्यासह असंख्य लोक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.