आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ शैक्षणिक संकुलात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता!!

"एमसीए" बरोबर एमई-कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ला परवानगी!!

समर्थ शैक्षणिक संकुलात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता!!

“एमसीए” बरोबर एमई-कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ला परवानगी!!

ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार उच्च शिक्षणाच्या संधी!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे (बांगरवाडी) या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन (एमसीए) व एम ई-कॉम्प्युटर आणि एम ई-व्ही एल एस आय एम्बेडेड सिस्टीम हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीने व महाराष्ट्र शासनाने परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.

हे अभ्यासक्रम सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेकविध करियच्या उपलब्ध संधी हस्तगत करता येणार आहेत.त्याचप्रमाणेलिंकडीन,मायक्रोसॉफ्ट,फ्लिपकार्ट,ऍमेझॉन,ओला,एरटेल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांसारख्या कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
पदवी अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ची प्रवेश क्षमता ९० वरून १२० तसेच पदव्युत्तर पदवी मध्ये कंप्यूटर इंजीनियरिंग-३० तर व्हीएलएसआय एमबीडेड सिस्टीम या अभ्यासक्रमास १८ इतकी प्रवेश क्षमता असणार आहे.
ई-कॉमर्स,आरोग्य,शिक्षण,सहकार व तंत्रज्ञान,ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ती कमतरता भरून काढण्यासाठी हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गाच्या मागणीनुसार बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी व ग्रामीण भागातील संशोधनात्मक उपक्रमांना चालना व प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे नवीन अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन,सी ई टी सेल,डी टी ई मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून अधिक माहितीसाठी प्रा.प्रदीप गाडेकर-९६३७२३८०३४ यांच्याशी संपर्क साधावा तसेच शासनाच्या व सी ई टी सेल च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.