आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ गुरुकुल मध्ये फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन!! विद्यार्थ्यांसाठी हसत-खेळत विज्ञान उपक्रम!!

समर्थ गुरुकुल मध्ये फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन!!
विद्यार्थ्यांसाठी हसत-खेळत विज्ञान उपक्रम!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुकतेच विज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे तसेच वैज्ञानिक संकल्पना प्रयोगाच्या माध्यमातून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडल्या तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानामध्ये गोडी निर्माण होईल असा विश्वास डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान वाहिनी फिरती प्रयोगशाळेचे जनक देवराव कांबळे यांनी व्यक्त केला.

समर्थ गुरुकुल येथील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना “प्रयोग विज्ञानाचे” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये देवराम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आम्ल व आम्लारी यांचे गुणधर्म,हवेचा दाब,गुरुत्वाकर्षण शक्ती,विजेचे होणारे वहन,अर्थिंग च्या साहाय्याने एल इ डी बल्ब चालू बंद करणे,ओहमचा नियम,कंठातून निघणाऱ्या स्वरांच्या लहरी,ध्वनीची निर्मिती व ध्वनीचे नियम,डी एन ए याविषयी प्रयोगाच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी देवराम कांबळे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा विद्यार्थ्यांपुढे सादर करून त्यांच्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके सचिव विवेक शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, सारिका ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,पर्यवेक्षक सखाराम मातेले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.