आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरविला भक्तीचा मळा!

पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरविला भक्तीचा मळा!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर या ठिकाणी अनेक लाखो वारकरी नतमस्तक होण्यासाठी पांडुरंग पांडुरंग करत पाई वारी जात असतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. आज असाच एक छानसा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव या ठिकाणी आषाढी वारी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थांनी पायी दिंडी सोहळा संपन्न केला.
सकाळी शाळेतून बाल दिंडीचे प्रस्थान झाले. विठू नामाचा जयघोष करत सर्व बाल वारकरी गावातुन मार्गस्थ झाले. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.