खडकवाडी (ता.आंबेगाव) गावचे मा. सरपंच श्री. अनिलशेठ सखाराम डोके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
साभार लेख - उद्योजक श्री.गुलाबाशेठ वाळुंज

आंबेगाव तालुक्यातील,सर्वार्थाने प्रगतशील गाव,राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारे गाव म्हणजे खडकवाडी गाव!!!राजकारणात गावाचे नाव नकाशात अधोरेखीत केले असे आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी गाव!!! या गावातील राजकीय-सामाजिक परंपरेचा आदर राखत,गावातील युवक गावच्या विकासासाठी पुढे आला व समाजसेवेचे व्रत धारण करून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा नेतृत्वांचा जन्म झाला.यातून काही नेतृत्व बहरत गेली व त्यांनी राजकारणात,समाजकारणात अनेक महत्वाची पदे पादाक्रांत केली. याच परंपरेचा, समाजसेवेचा वसा याच गावातील मा.आदर्श सरपंच श्री.अनिल डोके यांनी गावच्या विकासासाठी समाजसेवेचे इंद्रधनुष्य खांद्यावर घेतले व ते लीलया पेलले सुद्धा व यशस्वी केले!!!
मुख्य व्यवसाय शेती, किराना दुकानांचा व्याप असूनही सर्वसामान्यांसाठी समाजसेवेचे व्रत अंगीकारून आपल्या जन्मभूमी चे उपकार कधीही न विसरता आपल्या मातीशी सदैव नाळ असणारे अनिल डोके एक आदर्शवत आहेत!!!
ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच असा राजकीय प्रवास व इथूनच राजकारणाची व समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गावच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या.
मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आपले आदर्श आणि नेता मानणाऱ्या आपल्या गावासाठी गेले २० वर्षे अत्यंत अभ्यासृवृत्तीने केलेल्या कामाच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांना अनेक वेळा खडकवाडी गावच्या सरपंचपदी काम करण्याची संधी प्राप्त झाली.ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधा पुरविताना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष दिले.पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शासनाच्या योजना गावांत अधिक गतीने आणल्या.
अनिल डोके यांनी आपल्या गावाशी, मातीशी आणि सहकार्याची असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही, गावकऱ्यांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होत गावच्या संपर्कात राहण्याने त्यांना गावच्या प्रथम नागरीक होण्याचा सन्मान अनेक वेळा त्यांना प्राप्त झाला.
पिण्याच्या पाण्याची योजना योग्य प्रकारे कार्यान्वित करून स्वच्छ व शुध्द आणि मुबलक पाणी नागरिकांना कसे मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते. गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अभ्यासात मागे पडणार नाहीत, याची विशेष काळजी घेऊन शिक्षणासाठी ते प्रयत्नशील असतात.
मा.जिल्हा परिषद उपअध्यक्ष अरुण भाऊ गिरे आणि मा.पंचायत समिती सदस्य रविभाऊ करंजखिले यांच्या नेतृत्वाखाली गावचे वाडी वस्तीवरी रस्ते,गावातील अंतरगतर्गत रस्ते, बंदिस्त साडपाणी योजना,अंगणवाड्या,शाळा, स्मशानभूमी सुशोभीकरण आशा विवीध विकास कामांबाबत खडकवाडीगांवला खुप पुढे घेऊन जाण्याची संधी त्यांना मिळाली.
अशा एक आदर्श मा.सरपंच श्री.अनिल डोके
यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!