आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

कुंडमाऊली महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!!

कुंडमाऊली महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

शिरुर तालुक्यातील जांबुत या ठिकाणी टाकळी हाजी कवठे यमाई या – जिल्हा परिषद गटातील कुंडमाऊली महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मा. श्रीम. सुनीता गावडे जिल्हा परिषद सदस्या, मा. डॉ. कल्पना पोकळे पंचायत समिती सदस्या, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष पुणे मा. श्रीम. वृषाली मोहिते सामाजिक उद्योजकता तज्ञ रियाज फिरजादे , दे आसरा फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीम. ऐश्वर्या कुलकर्णी, शारदा क्षिरसागर अध्यक्ष कुडमाऊली प्रभागसंघ, शिल्पा ब्राम्हणे ता. अभियान व्यवस्थापक पं.स. शिरुर, सोनाली झेंडे सचिव कुंडमाऊली प्रभागसंघ सायली केदारी, कोषाध्यक्ष दादासाहेब शिंदे ,ता. व्यवस्थापक पं.स. शिरुर, अनिल नरके प्रभाग समन्वयक, स्नेहल मॅडम, बैंक ऑफ महाराष्ट्र व पी.डी.सी.सी बँकेचे शाखा व्यवस्थापक सर्व गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामसंघाच्या पदाधिकारी, लिपिका व ४४७ स्वयं सहायता समुहातील ११३०महिला बहु संख्येने उपस्थित होत्या.

या दरम्यान चार समुहातील महिलांनी आपल्या उत्पादनाचे स्टॉल लावले होते, तसेच मा. वृषाली मॅडम यांच्या हस्ते चार ग्रामसंघाना सी.आय.एफ १३ लाख ८० हजार रुपये चा निधी वितरित करण्यात आला.

दरम्यान रियाज फिरजादे यांनी महिलांना उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्व बाबींवर मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे दे आसरा फाउंडेशनच्या प्रतिनिधी नी उत्पादने वाढवणे व मार्केटिंग संदर्भात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच जल जीविका मिशन या सामाजिक संस्थेच्या सहकायनी उपस्थित सर्व महिलांना कार्यक्रमात शेवग्याच्या रोपांचे वाटप करुन एकाच दिवशी ११११ झाडे लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. तसेच उमेद अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केलेल्या उठ्हा चा देखील सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

प्रभागसंघा अंतर्गत आज अखेर झालेले कामकाज प्राप्त निधी, जमा, खर्च ईत्यादीचे अहवाल वाचन प्रभागसंघाच्या लेखापाल यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद व शुभेच्छा दिल्या व सर्व सहकार्य करण्याचे आधासन दिले. प्रभागसंघाच्या कोषाध्यक्ष सौ. सायली केदारी यांनी उपस्थित सर्व उपस्थीतांचे आभार मानले..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.