आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आपले विचारांचे स्विच परमात्मा सोबत जोडलेले असेल तेव्हा मेंदूचे प्रकंपन स्थिर असतात व त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होतो- राजयोगी डॉ. प्रेम मसंत

आपले विचारांचे स्विच परमात्मा सोबत जोडलेले असेल तेव्हा मेंदूचे प्रकंपन स्थिर असतात व त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होतो- राजयोगी डॉ. प्रेम मसंत

नाशिक -आपल्या मेंदूचे प्रकंपन आपल्या विचारांनी संचालित होतात. जर आपले विचार अनियंत्रित असतील व गतिशील असतील तर आपल्या मेंदूचे प्रकंपन सुद्धा तितक्याच वेगाने पसरत असतात आणि ज्या वेळेस मेंदूचे प्रकंपन अधिक असतात त्यावेळेस आपल्या शरीराची नर्वस सिस्टम सुद्धा अतिशय गतिशील होते जर आपले विचारांचे स्विच परमात्मा सोबत जोडलेले असेल तेव्हा मेंदूचे प्रकंपन स्थिर असतात व त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होतो. ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व संचालिका दादी जानकी जी यांच्या मेंदूचे ब्रेन वेव्ह हे अल्फा स्वरूपाचे होते कोणाशीही बोलताना किंवा चालताना दादीजींचे वेव्ह हे अल्फा स्वरूपातले असत अल्फा वेव्ह मध्ये मनुष्य शरीराची हिलिंग अर्थात बरे होण्याची प्रक्रिया जलद गतीने होत असते. आपल्या ब्रेन वेव्ह नियंत्रित करण्यासाठी नियमित शारीरिक व्यायामासोबत मनाला दिशा देणारा राजयोग मेडिटेशन सुद्धा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयातील वरिष्ठ राजयोग शिक्षक डॉक्टर प्रेम मसंत यांनी केले. दिनांक 22 मे रोजी येथील यशवंत महाराज पटांगण आयोजित वसंत व्याख्यानमालाचे चे 22 वे पुष्प गुंफताना त्यांनी हे वक्तव्य केले.


स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आजच्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी, अजित सुराणा राजेंद्र देशपांडे नामको बँकेचे संचालक सुभाष नहार व उद्योजक सुनील चोपडा संगीता बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.


सोबतच नाशिक येथील विविध सेवा केंद्राच्या समर्पित भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्माकुमार ओंकार यांनी भावगीत गाऊन उपस्थित श्रोत्यांचे मने जिंकली. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले तर बी के राजन भाई यांनी डॉक्टर प्रेममसंत यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.


आपल्या अभ्यासू वक्तव्य विचार म्हणजे अशा इलेक्ट्रोकेमिकल घटना आहेत, ज्यांचे परिणाम शरीरावर होतात. मनातील नकारात्मक आणि फालतू विचारांच्या अतिउत्पादनामुळे तणाव निर्माण होतो. मनात वारंवार येणारा एकच नकारात्मक विचार नैराश्याला कारणीभूत ठरू शकतो. मानसिक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ताण/नैराश्य. आहार, भावना आणि पर्यावरणातील बदलांमुळे विषारी घटकांची शरीरात निर्मिती होते. नकारात्मक भावना डीएनएची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी करतात.


या सर्व आजारांवर काय उपाय करता येतील तसेच या आजारांपासून कसे सुरक्षित राहता येईल याचे मार्गदर्शन डॉ. प्रेम मसंद या याप्रसंगी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.