आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाचे आयोजन !!

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाचे आयोजन !!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात हिंदू धर्मरक्षक, हिंदुस्तानची कर्तुत्वान महिला,आदर्श शासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सवाचे सोहळा संपन्न केला जाणारा असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

या निमित्ताने गुरुवार दि. 30 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ज्योतीचे प्रस्थान होणार आहे. शुक्रवार दि. 31 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रतिमापूजन व ज्योत पूजन,सकाळी 11 ते 4 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर,सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक सोहळा,सायंकाळी 7 वाजता महाआरती, प्रस्तावना लहान मुलांची भाषणे, 8.30 वाजता महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर चा कार्यक्रम,रात्री 10 वाजता मान्यवरांचे मनोगत व सत्कार समारंभ, रात्री 10 नंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 

महिला भगिनींसाठी संपन्न होणाऱ्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. तसेच प्रथम क्रमांकासाठी मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ,आणि तृतीय क्रमांकासाठी डिनर सेट आदी बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे.

 

या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.