आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दिनेश कार्तिकची आय.पी.एल.मधून निवृत्ती!!आर.सी.बी.ने दिला गार्ड ऑफ ऑनर!!

दिनेश कार्तिकची आय.पी.एल.मधून निवृत्ती!!आर.सी.बी.ने दिला गार्ड ऑफ ऑनर!!

अहमदाबाद : आर.सी.बी.चा सुपर स्टार खेळाडू दिनेश कार्तिकने आय.पी.एल.मधून निवृत्ती घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तीन दिवसांपूर्वी दिनेशने आपले हे अखेरचे आय.पी.एल. असेल असे सुतोवाच केले होते.
त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात आर.सी.बी.ला पराभव पत्करावा लागला.हा सामना झाल्यावर आर.सी.बी.च्या संघाने दिनेशला गार्ड ऑफ हॉनर हा सन्मान दिला.

दिनेशने आर.सी.बी.कडून खेळताना आपली खास ओळख निर्माण केली होती.अखेरच्या षटकांमध्ये येऊन दिनेश मोठी फटकेबाजी करायचा. धडाकेबाज फटकेबाजी करत दिनेश आर.सी.बी.ला मोठी धावसंख्या उभारून द्यायचा. त्यामुळे दिनेश आर.सी.बी.साठी एक महत्वाचा खेळाडू होता.
पण यापुढे आता दिनेश आर.सी.बी.कडून खेळताना पाहायला मिळणार नसल्याचे समोर येत आहे. कारण दिनेशने आय.पी.एल.मधून आता आपली निवृत्ती जाहीर केली, असल्याचे म्हटले जात होते.

आर.सी.बी.च्या संघाने चेन्नईवर मात केली आणि त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान निर्माण केले होते. त्यावेळी आर.सी.बी. एलिमिनेटर सामन्यात खेळणार हे स्पष्ट झाले होते.
पण या सामन्याता तीन दिवस शिल्लक असताना आपले हे अखेरचे आय.पी.एल. असेल असे सुतोवाच दिनेशने केले होते. त्यावेळी बऱ्याच जणांना ते खरे वाटले नव्हते.
पण आर.सी.बी.चा एलिमिनेटरचा सामना संपला आणि त्यानंतर आर.सी.बी.च्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर दिनेशने हा सन्मान स्विकारला. त्यानंतर त्याने चाहत्यांचे अभिवादनही स्विकारले.त्यामुळे दिनेश निवृत्त झालाय का?असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. कारण त्यावेळी याबाबतची अधिकृत माहिती कोणीही दिली नव्हती.

पण दिनेश ज्या प्रकारे यावेळी वागत होता,त्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटत होते.
पण जिओ सिनेमा या या आय.पी.एल.चे प्रसारण हक्क असेलल्या कंपनीने दिनेशचा एक फोटो टाकला आणि त्यानंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटत होते.
पण याबाबत दिनेशने अधिकृत घोषणा मात्र केली नाही.
आय.पी.एल.मध्ये दिनेश कार्तिक एकूण सहा संघांकडून खेळला.

गेली १६ वर्षे दिनेश आय.पी.एल.मध्ये खेळत होता.
पण आता मत्र दिनेशने आय.पी.एल.ला अलविदा केला आहे. आता दिनेश यापुढे काय करणार?याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे.दिनेश हा काही वर्षांपूर्वी के.के.आर.चा कर्णधार होता.पण कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळी दिनेशची कारकिर्द संपली,
असे वाटत होते.पण दिनेशला आर.सी.बी.ने आपल्या संघात स्थान दिले आणि त्यानेही या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. आर.सी.बी.कडून खेळताना दिनेशने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यामुळेच त्याला आय.पी.एल.चे चाहते कधीच विसरणार नाहीत.
आता दिनेश काय करणार ?याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना मात्र नक्कीच असेल.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.