आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गावडेवाडी(ता.आंबेगाव) शाळेतील विद्यार्थी सलग तिसऱ्या वर्षी MKCL Olympiad Movement (MOM) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम!!

गावडेवाडी(ता.आंबेगाव) शाळेतील विद्यार्थी सलग तिसऱ्या वर्षी MKCL Olympiad Movement (MOM) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम!!

प्रतिनिधी-(शिंगवे पारगाव) आंबेगाव
समीर गोरडे

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गावडेवाडी शाळेतील विद्यार्थी सार्थक संतोष गावडे, याचा MKCL Olympiad Movement (MOM)परीक्षेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक* आला आहे. प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल MKCl च्यावतीने शैक्षणिक साहित्याचे किट बक्षीस रूपाने देण्यात आले. या वेळी ओम इलेक्ट्रो कम्प्युटर व साक्षी कॉम्प्युटरच्या संचालिका अरुणा प्रदीप लोंढे, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे,नारायण गोरे सभापती आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था,शशिकला चिखले मुख्याध्यापिका, महेश शिंदे, अरविंद मोढवे वर्गशिक्षक उपस्थित होते.

सार्थक याने मिळविलेल्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सविता माळी, विस्तार अधिकारी काळूराम भवारी,गजानन पुरी, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे, विषय तज्ञ ज्योत्स्ना माशेरे, सरपंच विजय गावडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे,उपाध्यक्ष जालिंदर गावडे, मेंगडेवाडी व पारगाव केंद्रातील सर्व शिक्षकांनी यावेळी सार्थकचे अभिनंदन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.