आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक ध्यानपीठात श्रीराम नवमी उत्सव उत्साहात संपन्न !

आत्मा मालिक ध्यानपीठात श्रीराम नवमी उत्सव उत्साहात संपन्न !

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत भारतमाता व संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त, स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा – कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक ध्यानपीठात श्री राम नवमी उत्सव उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे मुख्य लेखा परीक्षण अधिकारी शशिकांत सरफरे , लेखापरीक्षक सतीश अदमाने, संकुलाचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव, वृषालीताई जाधव, स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड, व्यवस्थापक गुलाब हिरे, शैक्षणिक व्यवस्थापक तथा प्राचार्य डॉ. डी. डी. शिंदे, स्टेट बोर्ड प्राचार्य पंकज बडगुजर , सी.बी.एस्.ई उपप्राचार्य जालिंदर हासे , प्रा. गोविंद चव्हाण, प्रा.डॉ. सचिन मुंढे , प्रा. उल्हास पाटील,वसतिगृह व्यवस्थापक शरद ब्राम्हणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा परिधान करून रामायणतील प्रसंगावर नृत्य सादर केले.याप्रसंगी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मान्यवरानी प्रभू श्रीराम जीवनातील कथा सांगितल्या तसेच अध्यात्मिक ,शैक्षणिक विकास करायचा असल्यास त्यांची प्रभु श्रीरामचद्रांची जीवनसूत्रे अंगीकरावी लागतली असे सांगितले यावेळी स्वरांजली ग्रुप संगीत शिक्षक लक्ष्मण साळुंखे, समाधान काटे, नरेंद्र गोसावी यांनी उपस्थितांना भजन सेवेने मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम पानबुडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होता.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.