आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

उष्माघाताने जनावरांना होणारा त्रास व उन्हाळ्यात जनावरांची शेतक-यांनी काळजी घ्यावी-पशुधन विकास अधिकारी डॉ.पुजा बोंबले

उष्माघाताने जनावरांना होणारा त्रास व उन्हाळ्यात जनावरांची शेतक-यांनी काळजी घ्यावी-पशुधन विकास अधिकारी डॉ.पुजा बोंबले

प्रतिनिधी-समीर गोरडे

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात, हिवाळ्यात वातावरणात बदल झाला की वातावरणाचा परिणाम जनावरांच्या शरीरावर होतो त्यामुळे जनावरांमध्ये उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास संभवतो उन्हाळ्यात जनावरांच्या जनावरांच्या खाण्यात अपौष्टिक असा चारा खाल्ला जातो त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण व जीवनसत्व व क्षारचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावरांची भूक मंदावते अशक्तपणा येतो पाणी कमी पिल्यामुळे दूध उत्पादन कमी होते.

जनावरांची कातडे रखरखीत होते डोळ्यांमध्ये चिपडे व घाण येते जनावरांचा तोल जातो व जनावरे आजारी पडतात. त्यामुळे अशा उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जनावरांचा गोठा हा हवेशीर असावा गोठ्यात जनावरांची गर्दी टाळावी गोठ्यात जनावरांचे छत उन्हामुळे तापत असेल तर त्यावर कडबा किंवा पेंढा याचा थर द्यावा पेंढ्यावर प्रक्रिया करून पौष्टिक असा पेंडा जनावरांना खायला द्यावा. पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करावे जनावरांना सकाळी थंड हवेत ७ ते ९ किंवा संध्याकाळी ४-६ते सहा या वेळेत घेऊन जावे म्हणजेच जनावरांना भर उन्हात चरायला नेऊ नये. जनावरांचा गोचीडंपासून संरक्षण करावे. जनावरांचे वेळोवेळी जंत निर्मूलन व लसीकरण करून घ्यावे. खनिज मिश्रणाने वेळोवेळी द्यावेत. पशुखाद्यामध्ये गुळाचां,मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रो लाईट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ जनावरांना संतुलित पशु आहार सोबत खनिज मिश्रण द्यावेत व चाऱ्यामध्ये एकदम बदल करू नये. बैलांकडून शेतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावेत त्यावेळी त्यांना पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल व त्यात आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करावा.

म्हशीच्या कातडीचा काळा रंग उष्णता शोषून घेतो व घामग्रंथींचे कमी संख्या असल्यामुळे जास्त होतो त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी जर उष्णता बाहेर जास्त वाटत असेल तर गोणपाटासारखे पोती ही पाण्यात भिजवून जनावरांच्या अंगावर टाकावे जेणेकरून उष्माघाताचा त्रास कमी जाणवेल व गोठा थंड राहण्यासाठी गोठ्याभोवती बारदाने किंवा शेडनेट लावावे शक्य असल्यास ते पाण्याने भिजवावे त्यामुळे गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी मदत होईल .. व वेळोवेळी ऋतुनुसार फैलाव होणाऱ्या आजारांचे लासिकरण जसे की लाळ्या खुरकूत, घटसर्प, लम्पी विषाणू लसिकरण कटाक्षाने पशुपालकाने करून घ्यावे अशी माहिती ही पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक पाटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर पूजा बोंबले यांनी मार्गदर्शन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.