आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे रामनवमी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे रामनवमी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न!!

धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन राम मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थाच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात बुधवारी साजरा करण्यात आला.

 

सोळाव्या शतकात संतश्रेष्ठ जगदगूरु संत तुकाराम महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीराम,लक्ष्मण व सितामाई यांच्या मूर्तीची पुर्नप्राणप्रतिष्ठापना झालेली असल्यामुळे येथील श्रीराम मंदिरात रामजन्म सोहळ्यासाठी वारकरी सांप्रदाय व वारकर्‍यांची व पंचक्रोशीतील भाविकांची व ग्रामस्थांची मोठी गर्दी झालेली असते. पहाटे देवस्थानाचे मुख्य पुजारी मधुकर महाराज क्षिरसागर व मुकुंद क्षिरसागर यांच्या हस्ते पंचामृताने श्रीराम,लक्ष्मण सितामाईच्या मूर्तीना अभिषेक करण्यात आला.त्यानंतर या सर्वागसुंदर देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले. त्यानंतर महाआरती होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी पहाडदरा,शिरदाळे,जारकरवाडी, खडकवाडी येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.सकाळी दहा वाजता ह.भ.प.परमेश्वर महाराज पांचाळ आळंदीकर यांचे रामजन्माचे किर्तन झाले.किर्तनाला साथ देण्यासाठी आळंदी येथील ज्ञानेश संजीवन वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख ह.भ. प. गणेश महाराज गंलाडे व त्यांच्या संस्थेतील वारकरी सामील झालेले होते. संस्थेतील बालवारकर्‍याच्या उपस्थितीने रामजन्माच्या किर्तनाला रंगत आली. मंदिरात व देवाच्या पाळण्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. भाविकांच्या व महिलाच्या गर्दीनै मंदिराचा सभामंडप भरलेला होता.

रामजन्माच्या वेळी देवाच्या पाळण्यावर महिला भाविकांनी भुईमुगाच्या शेंगा,रेवड्या,खारका उधळल्या. हा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडालेली दिसत होती.दुपारी बारा वाजता मुकुंद क्षिरसागर व बाळासाहेब बेरी यांनी श्रीरामाची पंचधातूची मूर्ती पाळण्यात ठेवली. त्यानंतर सरपंच रेश्मा बोर्‍हाडे व गूणवंती क्षिरसागर यांच्यासह महिला भाविकांनी “राम जन्मला गं सखे राम जन्मला” हा रामजन्माचे पाळणागीत म्हणण्यात येऊन यंदाचा रामजन्माचा सोहळा उत्साहात व आनंदात पार पडला.

यावेळी मंजुश्री क्षिरसागर,प्रिया क्षिरसागर,मोहीनी क्षिरसागर,विद्या रायरीकर,जयश्री पुरंदरे,शुंभागी कुलकर्णी,चैतन्य पुरंदरे,आदीनाथ जाधव,पांडुरंग बोर्‍हाडे,मच्छिंद्र वाघ,अजित बोर्‍हाडे,सागर जाधव,अक्षय विधाटे,गुंडाजी भुमकर,प्रमोद देखणे,दिलीप आळेकर,सुनील सासवडे,खंडूमामा बोत्रे,दत्ता बोर्‍हाडे,स्वप्निल शिंदे,माऊली कडूसकर,विठ्ठल रायरीकर,कांता रायरीकर,लक्ष्मण रोडे,रमेश जाधव,वामन जाधव,वसंत जाधव,अरुण विधाटे,बाळासाहेब भुमकर गूरुजी,देवराम गवंडी,ज्ञानेश्वर बोर्‍हाडे,सूर्यकांत जाधव आणि देवस्थानाचे सेवेकरी क्षिरसागर कुटुंबिय उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.