आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ गुरुकुलच्या ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके!!

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन स्पर्धा परीक्षेत २४९ विद्यार्थ्यांचा सहभाग!!

समर्थ गुरुकुलच्या ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके!!

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन स्पर्धा परीक्षेत २४९ विद्यार्थ्यांचा सहभाग!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये यश मिळविल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

शालेय मुलांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित करण्यासाठी तसेच विज्ञान, गणित,संगणक,शिक्षण,इंग्रजी,सामाजिक अभ्यास,सामान्य ज्ञान,हिंदी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अग्रगण्य शैक्षणिक,वैज्ञानिक आणि मीडिया व्यक्तिमत्वांनी एकत्रित येऊन या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन ची निर्मिती केलेली आहे.या स्पर्धेच्या निमित्ताने नावीन्यपूर्ण प्रक्रिया आणि आयटी चा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार आणि दृष्टिकोन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो.

या परीक्षेमध्ये समर्थ गुरुकुल चे एकूण २४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली.
जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेत साई आग्रे यास सुवर्णपदक प्राप्त झाले.इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत अनन्या पोटे,शिवराज भांबेरे,सार्थक गोफणे,काव्या दाते,स्वरा गुंजाळ,स्पंदन आहेर,पृथ्वीराज हाडवळे या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

यशस्वी विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज विषयाच्या शिक्षिका अर्चना बांबळे,योजना औटी,जयश्री लबडे,शितल पाडेकर,रामचंद्र मते,प्रतीक्षा पटाडे,रूपाली भांबेरे,प्रिया कडूसकर,कविता ठुबे,विशाखा शिंदे,वैशाली सरोदे,अक्षता गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.
मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये अनन्या पोटे,श्रीशैल आहेर,नाचफातिमा मोमीन,शिवराज भांबेरे,सार्थक गोफणे,तेजस्विनी आहेर,मनस्वी भांबेरे,सिद्रा पटेल,आराध्या डोंगरे,श्रीनिका शेळके,काव्या बोरचटे,साहस वैद्य,संस्कृती आहेर,हर्षवर्धन आरोटे,समृद्धी शेळके,प्रगती औटी,प्रांजल दाते,सार्थक शेळके,सरी आहेर,अद्वैत शिंदे,आर्यन गायके,सृष्टी भांबेरे,वेदांत चिकणे या सर्वांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
नॅशनल सायन्स स्पर्धेत नाज फातिमा मोमीन,काव्या दाते,मनस्वी भांबेरे,श्रीनिका शेळके,संस्कृती आहेर,आराध्या आहेर,समृद्धी शेळके, सरी आहेर,सानिका बांगर,तनया भाईक यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.


सोशल सायन्स ऑलिम्पियाड मध्ये संस्कार देशमाने,प्रगती औटी,सार्थक शेळके,श्रेयश डोंगरे यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,सारिका ताई शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.