आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सौ.मोनिका सोमनाथ दरगुडे- हिंगे यांची खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावडी पिंपळगाव गणाच्या अध्यक्षपदी निवड!!

सौ.मोनिका सोमनाथ दरगुडे- हिंगे यांची खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावडी पिंपळगाव गणाच्या अध्यक्षपदी निवड!!

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावडी-पिंपळगाव पंचायत समिती गणाच्या अध्यक्षपदी सौ.मोनिका सोमनाथ दरगुडे-हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

खेड येथे संपन्न झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार मा.खा.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील,खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते,राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संध्या मुरलीधर जाधव, रेटवडी-दावडी पंचायत समिती गणाच्या अध्यक्ष रूपालीताई गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील,खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे,आचार विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, पक्षाची ध्येयधोरणे तळागळापर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सौ.मोनिका सोमनाथ दरगुडे यांनी निवडीनंतर बोलताना दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.