आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे भैरवनाथ उत्सव उत्साहात संपन्न!!

 

धामणी(ता.आंबेगाव) येथे भैरवनाथ उत्सव उत्साहात संपन्न!!

धामणी ( ता. आंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिराचा उत्सव फाल्गुण वद्य चतुर्दशीला (रविवारी) मांडवडहाळे,हारतुरे,कलश मिरवणूक व पालखी सोहळ्याने संपन्न झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

धामणी येथील खालच्या वेशीजवळील दोनशे वर्षापूर्वीचे पुरातन भैरवनाथ मंदिर असून,फाल्गुन महिण्यातील वद्य चतुर्दशीला दरवर्षी ग्रामस्थाच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येतो. रविवारी सकाळी पारंपारिक वाद्याच्या गजरात मांडवडहाळ्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गुळखोबर्‍याची शेरणी वाटण्यात आली.

सकाळी अभिषेक व महापूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती मिरवणूकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.मंदिरात महिला भगिनीनी फुगड्या व फेर धरुन भैरवनाथाचा जयजयकार केला.रात्री भैरवनाथ बटूक भैरव व जोगेश्वरीच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.भैरवनाथाचे चांगभलेचा जयघोष करुन भंडार्‍याची उधळण करण्यात आली. त्यानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी समस्त ग्रामस्थ धामणी व भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळी शिवराय सेवा मंडळाचे तरुणानी भैरवनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम व मंदिराच्या शिखराचे आकर्षक रंगभरणीचे काम खंडोबाच्या माही पुनवेच्या यात्रेपर्यत लोकवर्गणीतून पूर्ण करुन शिखराचे कलशारोहण करण्याचा भैरवनाथाचा चांगभलेचा जयघोष करून व भंडारा उधळून एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचे जथेकरी समस्त रोडे मंडळीनी यावेळी सांगितले.

यावेळी लक्ष्मणराव रोडे,सूर्यकांत रोडे,निलेश रोडे,शांताराम रोडे,किसनराव रोडे,कैलास रोडे,अक्षय रोडे,दिलीप रोडे,प्रविण रोडे,डाँ शुभम रोडे,गोपाळराव रोडे सर,कोंडीभाऊ रोडे,बारकू रोडे,नामदेव रोडे,रविंद्र रोडे,तुषार रोडे,अनिकेत रोडे,बाबाजी रोडे,हनुमंत रोडे,दत्तात्रय रोडे,सुभाष रोडे,यशराज रोडे.सुरेश रोडे,सागर रोडे,सुहास रोडे,तान्हाजी रोडे,विकास रोडे,चंद्रकांत रोडे,अमर रोडे,काळूराम रोडे, सुनंदा रोडे,सुमन रोडे,अरुणा रोडे,सुनिता रोडे,कमल रोडे,रोहीणी रोडे,लता रोडे,सुरेखा रोडे,आशाबाई रोडे,बबूबाई रोडे,रंजना रोडे,अंजना रोडे उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.