आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत यश!!

१५ सन्मानपदके,२ मेरिट अवॉर्ड पटकावत २२ विद्यार्थ्यांचा सहभाग!!

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत यश!!

१५ सन्मानपदके,२ मेरिट अवॉर्ड पटकावत २२ विद्यार्थ्यांचा सहभाग!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सी बी एस ई मान्यता प्राप्त इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव कला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये २२ विद्यार्थी यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.

रंगभरण स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,ग्रीटिंग कार्ड स्पर्धा,कोलाज मेकिंग स्पर्धा,कार्टून मेकिंग,स्केचिंग स्पर्धा,फोटोग्राफी स्पर्धा,फिंगर प्रिंटिंग स्पर्धा या विविध कला स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी २२ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत विविध पदके पटकावल्याची माहिती एच पी नरसुडे यांनी दिली.
प्रिया राजदेव या इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनीने स्केचिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.या विद्यार्थिनीला बोट कंपनीचे डिजिटल घड्याळ व सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले.इयत्ता आठवी मधील कार्तिकी किथे व सहावी मधील श्रावणी चौधरी या विद्यार्थिनींनी रंगभरण स्पर्धेमध्ये आर्ट मेरिट पुरस्कार मिळवला.या दोन्हीही विद्यार्थिनींना कला गुणवत्ता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


रंगभरण स्पर्धेमध्ये इयत्ता सातवी मधील सोहम शिरोळे,इयत्ता चौथी मधील श्रीनिका शेळके,इयत्ता पाचवी मधील गौरी चौधरी,इयत्ता दुसरी मधील शिवम गांधी,इयत्ता पहिली मधील पारस मोरे,इयत्ता चौथी मधील जान्हवी वाडेकर,इयत्ता तिसरी मधील आर्या गोरडे या विद्यार्थ्यांना सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले.तसेच इयत्ता पाचवी मधील समृद्धी शेळके हिने ग्रीटिंग कार्ड स्पर्धेमध्ये सन्मान पदक मिळवले.त्याचप्रमाणे इयत्ता सातवी मधील सरी आहेर व श्रावणी गुंजाळ,इयत्ता पहिली मधील प्रभास बांगर,दुसरी मधील तेजस्विनी आहेर,पाचवी मधील रिदा आतार या सर्व विद्यार्थ्यांना हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सन्मान पदक प्राप्त झाले.
इयत्ता पाचवी मधील ऋतू मटाले हिने कार्टून मेकिंग मध्ये,इयत्ता चौथी मधील आराध्य हाडवळे याने कोलाज मेकिंग स्पर्धेमध्ये सन्मान पदक मिळवले.
इयत्ता दुसरी मधील सार्थक गोफणे प्रणव कोरडे प्रणव कोरडे,इयत्ता तिसरी मधील मल्हार नायकवडी या विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
इयत्ता चौथी मधील जुई कोरडे हिने फिंगर अँड थम्ब प्रिंटिंग या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
सदर विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,संचालिका सारिका ताई शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.