धामणी(ता.आंबेगाव) मध्ये तरुणांनी विझवला वणवा!!

धामणी(ता.आंबेगाव) मध्ये तरुणांनी विझवला वणवा!!
धामणी गावच्या हद्दीत लोणी – पारगाव रस्त्यावरील पांगुळठिका येथे आज सकाळी १० वाजता आग लागलेली होती. धामणी कडुन लोणीकडे जात असताना लोणी गावचे ग्रामस्थ संतोष पोखरकर, बाळासाहेब सुतार, प्रकाश सिनलकर यांच्या निदर्शनास आले त्यांनी तत्काळ मा. सरपंच सागर जाधव यांना कळवले असता सागर जाधव यांनी ७-८ तरुणांना घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली व वन खात्याच्या धामणी बिटच्या पुजा पवार मॅडव व लोणी बिटच्या सोनल भालेराव मॅडम यांना फोन द्वारे संपर्क केल्याच्या नंतर रेस्क्यू टिम चे सदस्य कल्पेश बढेकर यांना या आगीची माहिती दिली.आग विझविण्याचे प्रयत्न करुन आग विझवली.
तेथे असणारी झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना वाचवली त्याचप्रमाणे वन्य जीव, पशु पक्षांची जीव वाचवण्यात आला.तेथे असणारे गवत हे स्थानिक जनावरे खात असतात त्यांचा चारा आगीत जळुन गेला असता.सर्व तरुणांनी झाडपाला व रेस्क्यू टिम सदस्य कल्पेश बढेकर यांनी हवा मारण्याच्या यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
मा. सरपंच सागर जाधव यांनी सांगितले की सदर आग कशी लागली की कोनी लावली याची कोणालाही कल्पना नाही परन्तु सर्वांना विनंती आहे की अशा आगी या मानवनिर्मित असतात तरी कृपया अशा आगी लावु नयेत उलट अशा आगी न लावण्या बाबत व नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करावी.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी मा. सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, राष्ट्रप्रेमी मंडळ लोणी चे अध्यक्ष प्रकाश सिनलकर, संतोष पोखरकर, बाळासाहेब सुतार, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे,वन विभाग रेस्क्यू टिम चे सदस्य कल्पेश बढेकर, आकाश जाधव, लालु जाधव, गोविंद जाधव यांनी प्रयत्न केले.