सामाजिक

समर्थ क्रीडा संकुलातील ११ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड !!

1011019421

११ खेळाडूंनी पटकावले प्रथम क्रमांक; पाच खेळाडूंना द्वितीय क्रमांक !!

पंचनामा प्रतिनिधी – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे तसेच जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ क्रीडा संकुल, बेल्हे येथे आयोजित जुन्नर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत समर्थच्या कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विविध वजनी गटांत समर्थच्या ११ खेळाडूंनी प्रथम क्रमांक, तर ५ खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ११ खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुलींच्या गटात जानवी नलावडे (५० किलो), सिद्धी गबाजी शिंदे (५९ किलो), अवनी अनिल औटी (६२ किलो), समृद्धी शिवाजी जाधव (६५ किलो), तनवी रामदास जाधव (७२ किलो), समीक्षा गोरक्ष माळी (७६ किलो) यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राजल नानाभाऊ दाते (५७ किलो) आणि अनुष्का निलेश शिंदे (६१ किलो) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

मुलांच्या गटात करण केशव बांगर (६३ किलो), सिद्धेश नवनाथ विश्वासराव (६७ किलो), विघ्नेश पवार (८२ किलो), प्रणव माने (९७ किलो) आणि धनंजय खंडू बेलकर (८० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. जीवन बांगर (१३० किलो), साई बाबाजी दिघे (४८ किलो) आणि सोहम नितीन शेलार (४१ किलो) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

अशा प्रकारे समर्थ क्रीडा संकुलाच्या एकूण १६ कुस्तीपटूंनी तालुकास्तरीय स्पर्धेत यश संपादन केले असून, प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ११ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्रा.चंद्रकांत कोकरे, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, प्रा. संजय कंधारे आणि प्रा. शाम फुलपगारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि अश्विनी जगदाळे यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

समर्थच्या कुस्तीपटूंनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
1010908108
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या संपन्न !!!

Chief Editor

समर्थ पॉलिटेक्निक मध्ये ४० विद्यार्थ्यांची एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम्समध्ये निवड !!

Chief Editor

शासनाच्या वीज पुरवठा न देण्याच्या धोरणाविरुद्ध धामणीकरांचा एल्गार !!

Chief Editor

Leave a Comment