सामाजिक

‘इंडस्ट्री 4.0’च्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी; समर्थ कॉलेजमध्ये औद्योगिक ऑटोमेशनवर मार्गदर्शन

1010532470


आय कॅप ऑटोमेशन सोबत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचा सामंजस्य करार; इंटर्नशिप व हँड्स-ऑन ट्रेनिंगला मिळणार चालना

1010532470

पंचनामा प्रतिनिधी – तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे उद्योगक्षेत्रात मोठे बदल होत असून औद्योगिक ऑटोमेशन, इंडस्ट्री 4.0, स्मार्ट तंत्रज्ञान आणि बुद्धिमान उत्पादनाला वाढते महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, करिअरच्या संधी आणि उद्योगांच्या अपेक्षेनुसार आवश्यक कौशल्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे औद्योगिक ऑटोमेशन व इंडस्ट्री 4.0 विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
समर्थ कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आय कॅप ऑटोमेशनचे चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जयेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील ऑटोमेशनची वाढती गरज, आधुनिक उत्पादन प्रक्रियेत तंत्रज्ञानाची भूमिका तसेच इंडस्ट्री 4.0 मुळे निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधी याबाबत माहिती दिली.
मार्गदर्शन करताना त्यांनी पीएलसी, स्काडा एचएमआय,रोबोटिक्स,कंट्रोल सिस्टिम्स, इंडस्ट्रियल कम्युनिकेशन आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्योगांमध्ये वाढता वापर होत असल्याचे स्पष्ट केले. केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून तांत्रिक कौशल्ये, समस्या सोडविण्याची क्षमता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि सतत नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने समर्थ कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि आय कॅप ऑटोमेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, हँड्स-ऑन ट्रेनिंग, औद्योगिक प्रकल्पांचा अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगभेटी आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
वर्गातील सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष औद्योगिक वातावरण यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असून, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आत्मविश्वासासह रोजगारक्षम कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.
समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके तसेच कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. डिपार्टमेंट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिपाली गडगे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रा. सुचिता साबळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

1010527525
1010527342

Related posts

महिला उन्नती वारी” उपक्रमाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Chief Editor

हजार लीटर दूधात शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचं ५०० लीटर पाणी;भेसळ खोरांचा पर्दाफाश !!

Chief Editor

वैदवाडी (जारकरवाडी ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन !!

Chief Editor

Leave a Comment