सामाजिक

स्वातंत्र्यदिनी असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन !!

img 20260813 wa0566

पंचनामा प्रतिनिधी – उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार- प्रसिद्धीसाठी राज्य स्तरावरुन विविध उपक्रम राबविले जात असून त्याअंतर्गत येत्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

माझे कुटूंब, गावाला १ मे २०२७ पर्यंत साक्षर करेल, मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन. मी माझ्या कुटूंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी मदत करेन. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी १०० टक्के योगदान देऊन माझा महाराष्ट्र, साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटीबद्ध आहे, अशी शपथ प्रत्येक शाळेत देण्यात यावी, असे श्री. कारेकर यांनी कळविले आहे.

1010457105

Related posts

पंचनामा विशेष – अशी कला,असे कलावंत श्री. तुकाराम दिनकर खिलारे

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे पंचायतराज माहिती रथाचे स्वागत!!

Chief Editor

‘इंडस्ट्री 4.0’च्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी; समर्थ कॉलेजमध्ये औद्योगिक ऑटोमेशनवर मार्गदर्शन

Chief Editor

Leave a Comment