सामाजिक

अखेर मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला !!

1009845423

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या अनेक महिन्यांपासून होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. सद्यस्थितीत मांदळेवाडी गावाला शिरूर तालुक्यातून वीजपुरवठा केला जात असल्याने संबंधित ठिकाणी होणाऱ्या लोडशेडिंगचा परिणाम मांदळेवाडी गावावर होत होता.

प्रामुख्याने दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

मांदळेवाडी गावाचा वीजपुरवठा आंबेगाव तालुक्यातील लोणी उपकेंद्रातून करण्यात यावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीसाठी मा. मंत्री,आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

या प्रयत्नांना यश मिळाले असून वडगावपीर येथून मांदळेवाडीपर्यंत नवीन उच्चदाब वीजवाहिनी (एचटी लाईन) टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. सुमारे ५० पोल उभारून ही वीजवाहिनी उभारण्यात येणार असून या कामासाठी अंदाजे २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महावितरणच्या मंचर विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुंज, संविदने गावचे मा.सरपंच वसंत पडवळ, मांदळेवाडी सरपंच उज्वला आदक, धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव पाटील, विजय आदक, उद्योजक चेतन पडवळ, बाळशीराम वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

1009828025
1009828034

Related posts

विजेच्या लपंडावाने मांदळेवाडीकर झालेत त्रस्त !!

Chief Editor

अजमेळा दिंडीचे कार्य कौतुकास्पद:- सौ.तृप्ती ताई राजेंद्र खरे यांचे प्रतिपादन !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बु.शाळेने राज्यात पटकावला तेरावा क्रमांक !!

Chief Editor

Leave a Comment