सामाजिक

देवगाव (ता.आंबेगाव) येथील शेतरस्त्याचा वाद अखेर मिटला;पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मध्यस्थीला आले यश !!

1009845540
1009845540

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथील गेल्या १४ ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा वाद अखेर मार्गी लागला असून पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या पुढाकाराने आणि मध्यस्थीने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

देवगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या वापरावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी महसूल विभागासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र कोणताही तोडगा निघाला नव्हता. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर प्रकरण पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात पोहोचले.

या प्रकरणाची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी संबंधित गावातील प्रमुख व्यक्ती व शेतकऱ्यांची दोन वेळा बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सर्व बाजू समजून घेतल्या.तसेच रस्त्यांबाबतचे कायदेशीर पैलू आणि उपलब्ध पर्याय यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.सर्व संबंधितांची मते ऐकून घेतल्यानंतर शेतरस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला.

यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

1009828026
1009760330
1009850522

Related posts

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी !!

Chief Editor

अशी कला, असे कलावंत – मा. रोहितकुमार कैलास नारायणगावकर साभार लेख- राजेंद्र डी. मोरे बारामती

Chief Editor

भिर्रर्र…. भिर्रर्र….झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त पहाडी आवाजात संपन्न झाली वडगावपीर येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत!!

Chief Editor

Leave a Comment