सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला !!

1009845817

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे ) येथे दि. १६/०६/२०२६ रोजी सुहास मिंडे यांच्या पोल्ट्री फार्मवर मध्यरात्री बिबट्याने लोखंडी जाळी असलेल्या कंपाऊंडच्या आतमध्ये प्रवेश करुन कोंबड्यावर हल्ला केला.यात १२० कोंबडया मृत्युमुखी पडल्या आहेत. ज्यामुळे सुहास मिंडे यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

img 20260617 wa0804

रात्री उशिरा सुहास मिंडे यांना कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते काही वेळातच बाहेर आले.सदर ठिकाणी कोंबड्या त्यांना मृतावस्थेत आढळून आल्या.

सदर घटनेची माहिती त्यांनी पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांना दिली. विठ्ठल ढोबळे यांनी वनविभागाच्या पुजा कांबळे यांना सदर घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या पुजा कांबळे यांनी पाहणी करून पंचनामा केला.

1009845819

यावेळी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,रंगनाथ चव्हाण, संतोष चव्हाण,विवेक चव्हाण आदी उपस्थित होते.

1009828026
1009760330

Related posts

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला एकल महिला दिन !!

Chief Editor

भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा !! १९२ वैद्यकीय पथके, १७६ रुग्णवाहिका, ४,५०० औषध किट,निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन !!

Chief Editor

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!

Chief Editor

Leave a Comment