सामाजिक

समर्थ आयटीआयच्या ४६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड !!

1009455173
1009455173

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ आयटीआय बेल्हे येथे एसपीएम ऑटो कॉम्प प्रा.लि.कंपनी,रांजणगाव,पुणे यांच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते.या मुलाखतीत विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.४६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.प्लांट एच आर हेड सिद्धेश्वर बोगडे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली.

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिकल,फिटर,मेकॅनिकल डिझेल,मेकॅनिक मोटार व्हेईकल,मेकॅनिक ट्रॅक्टर तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या ट्रेडमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये
ड्राफ्टसमन मेकॅनिकल विभागातील पूजा गागरे, जान्हवी गावडे , सिद्धी काटे , अनुजा काटे.

कॉम्प्युटर ऑपरेटरआणि प्रोग्रा. असि -.साक्षी दरेकर,मनीषा काळे

मेकॅनिक मोटार व्हेईकल-
माऊली चिकणे , निशांत बोंबे , सागर सरोदे, आर्यन जमदाडे, यश रसाळ, आदित्य थोरात, ओम येवले सौरभ जाधव , शुभम सुपेकर, आदित्य वाळुंज, साईराज थिटमे,मधुर जाधव, निलेश गाढवे.

फिटर -प्रदीप मधे, शुभम सरोदे , निलेश करगल, नयेश शिंदे, ओम भोर,, आदित्य राजापुरे

मेकॅनिक डिझेल- सार्थक भुजबळ, सिद्धेश काळे, प्रणव सणस,शुभम पारधी, सार्थक सोनुले , अविष्कार चौगुले, मयुर पटाडे,साहिल बर्डे, आयर्न मोरे, अक्षय पोखरकर,सार्थक खिलारी, आयर्न शिनलकर

मेकॅनिक ट्रॅक्टर – वैभव काकडे, अर्जुन डुकरे , यश ब्राह्मने करण डुकरे , ओम भांबीरे,प्रतीक लामखडे, आदित्य जगदाळे , गोविंद जगदाळे, शुभम उचाळे. या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्लेसमेंट प्रक्रिया यशस्वी करण्या साठी विकास कणसे, मनोज निमसे, आकाश जेजुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख,प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1774661449199

Related posts

शासनाच्या वीज पुरवठा न देण्याच्या धोरणाविरुद्ध धामणीकरांचा एल्गार !!

Chief Editor

हा रस्ता धुक्यात नव्हे तर धुळीत हरवला !!

Chief Editor

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

Leave a Comment