आपला जिल्हाराजकीयसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आनंदाचा शिधा” वाटप सुरू !!

 

आंबेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आनंदाचा शिधा” वाटप सुरू !!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून “आनंदाचा शिधा वाटप” ही योजना जाहीर केली होती.

या योजनेअंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संचात एक किलो रवा, एक किला चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश करण्यात आला असून आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथे शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व तालुका प्रमुख अरुण भाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सरचिटणीस काळुराम लोखंडे यांच्या शुभहस्ते नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे , बजरंग देवडे ,रायचंद गांधी मारुती बढेकर, उपस्थीत होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.