आरोग्य व शिक्षणराजकीयसामाजिक

सडोली खा.येथे योगशिबिर मोठ्या उत्साहात संपन्न!!

प्रतिनिधी - डॉ.सुरेश राठोड

सडोली खा. येथे योगशिबिर मोठ्या उत्साहात संपन्न!!

डॉ सुरेश राठोड-कोल्हापूर प्रतिनिधी

योग हि भारताला मिळालेली महान देणगी आहे. सडोली खा येथे सिद्धगिरी संस्थान कणेरी व संत गोरा कुंभार मंडळाच्या वतीने सलग 8 व्या वर्ष महिला योगशिबिराचे आयोजन करण्यात येते. रा.बा.पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित या शिबिरात सडोली, हिरवडे, बाचणी, कारभारवाडी या गावांतून 280 योगसाधक महिला सहभागी झाल्या. सलग अकरा दिवस पहाटे पाच ते साडेसहा या वेळेत आयोजित योगशिबिरात सिद्धगिरी मठाचे योगगुरू दत्तात्रय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या काळात योगासने व प्राणायाम, सर्वांग सुंदर व्यायाम संगीताच्या तालावर घेण्यात आले. महिलांच्या शारीरिक समस्येवर घरगुती आयुर्वेदिक उपाय या विषयावर रोज मार्गदर्शन होईल. सदर शिबीर आई कै.साऊबाई बापूसो पाटील स्मरणार्थ एकनाथ पाटील व दत्तात्रय पाटील यांनी मोफत आयोजित केले. पावसाच्या काळात दिनकर पाटील यांनी पांडुरंग सांस्कृतिक हॉल योगासाठी खुला करून दिला.
योगशिबिरात संयोजक म.गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त जीवनाची शपथ दिली. सलाम मुंबई फौंडेशन च्या वतीने व्यसनविरोधी जागृती चित्र प्रदर्शन मांडण्यात आले. या दिवशी शिवम प्रतिष्ठानच्या वतीने इंद्रजित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फळांचे वाटप करण्यात आले. तसेच विध्यार्थी वसतिगृहासाठी नित्योपयोगी वस्तू देण्यात आल्या.
शिबीर यशस्वी करण्यासाठी एकनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, रतन कुंभार, सुरेश कुंभार, प्रा.पवन पाटील, प्रा. निवास कुंभार, स्वप्निल पाटील (हिरवडे),मुख्याद्यापक श्री नेर्लेकर, शाम कुंभार, दयानंद कुंभार, अशोक साळोखे, डॉ बी. एच .पाटील, पोपट मगदूम, यांनी विशेष प्रयत्न केले.
स्वागत राज्य उत्पादनशुल्क निरीक्षक अशोक साळोखे यांनी तर आभार वृक्ष मित्र सुभाष पाटील यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.