धामणीच्या खंडोबाच्या यात्रेत भाविकांकडून जिर्णोध्दारासाठी ५,११,३७७/- ची देणगी जमा!!

धामणीच्या खंडोबाच्या यात्रेत भाविकांकडून जिर्णोध्दारासाठी ५,११.३७७/- ची देणगी जमा!!
धामणी ( ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत देवस्थानाच्या दोन दिवसाच्या यात्रा उत्सव काळात मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी भाविकांनी दान स्वरूपात ५,११,३७७/- दान केल्याची माहिती ग्रामस्थ,सेवेकरी मंडळी व जिर्णोध्दार समितीने पंचनामाशी बोलताना दिली.
धामणी येथील श्री खंडोबा देवस्थान पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे कुलदैवत असून माही पुनवेच्या यात्रेला तळीभंडार करण्यासाठी व देवाचे दर्शनासाठी हजारो भाविक आवर्जुन येत असतात. नुकत्याच झालेल्या यात्रेच्या दोन दिवसात मंदिर व परिसर जिर्णोध्दारासाठी हजारो भाविकांनी रुपये ५.११,३७७/ ची रक्कम देणगी स्वरुपात जमा झाली आहे.खंडोबा मंदिराचे व परिसराचे जिर्णोध्दाराचे काम चांगले व टिकाऊ झालेले असून येथील मंदिर जागृत व प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकप्रिय होत असल्याची भावना गावडेवाडी,महाळुंगे पडवळ,लांडेवाडी,तळेगाव ढमढेरे,कूरकूटवाडी,गुंजाळवाडी,पारुंडे येथील भाविकांनी व्यक्त केली.
दोन दिवसाच्या यात्रेत जमा झालेल्या देणगीची शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.मंदिर जिर्णोध्दारासाठी देणगी दिल्याबद्दल सर्व देणगीदाराचे,भाविकांचे समस्त ग्रामस्थ धामणी,पहाडदरा,शिरदाळे व ज्ञानेश्वर वस्ती,श्री खंडोबा मंदिर जिर्णोध्दार समिती यांनी आभार मानले आहेत.